चंद्रपूर: धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची माहिती
शहरामधील दीक्षाभूमी मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर येथे 15 आणि 16 ऑक्टो रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सदर सोहळ्यात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात. या दरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून दीक्षाभुमी मैदानकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.