वर्धा: वर्धेच्या ईश्वरी काळमेघ हिचा राष्ट्रीय सुवर्ण विजय! मुलींच्या १५ वर्षाखालील गटात भारतात प्रथम क्रमांक
Wardha, Wardha | Oct 13, 2025 प्रकाश तरण पुष्कर स्विमिंग टँक, भोपाळ (म.प्र.) येथे इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन आणि मध्य प्रदेश ट्रायथलॉन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ऑक्टोबर रविवारला पार पडलेल्या राष्ट्रीय अक्वाथलॉन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये वर्ध्याच्या ईश्वरी प्रिती विक्रम काळमेघ हिने थक्क करणारी कामगिरी करत भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती ता. १३ ला सायंकाळी ५ वाजता प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.