जिल्हाधिकारी यांचा नेर दौरा विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा जिल्हाधिकारीविकास मीना शासकीय योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज नेर तालुक्याचा दौऱ्यादरम्यान दिले. नेर दौऱ्यात त्यांनी विविध शासकीय विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन तसेच कृषी विषयक प्रकल्पांना भेटी दिल्या