पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या पचखेडी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे तालुका महसूल विभागाच्या पथकाने अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना घडली. त्यावरून मुरूम व टिप्पर जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध वेलतुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई महसूल विभागाच्या पथकाने केली.