ओडीशा राज्यातील राष्ट्रीय अधिवेशन सत्तेचा वापर करून रद्द केल्याच्या निषेधार्थ, भारत मुक्ती मोर्चा आणि त्यांच्या सहयोगी संघटनांच्या वतीने सोमवारी १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात घोषणाबाजी निषेध आंदोलन करण्यात आले.