अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात अचानक काही डुकरांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन सतर्क झालं. तपासणीअंती या डुकरांना अफ्रिकन स्वाईन फिव्हरची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी साकुरी परिसरातील एक किलोमीटरच्या आत असलेल्या डुकरांची शासनामार्फत किलिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाने मागील दोन दिवसांत सहा आणि आठ असे एकूण 14 डुकरे पकडून शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहेत. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.