पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र एकसंघ नियंत्रण,पवनी अंतर्गत येणाऱ्या मौदी गावाशेजारील जंगल शिवारात शुक्रवार दिनांक 5 डिसेंबरला एका वाघाच्या हल्ल्यात गाय चारत असलेला एक 58 वर्षीय शेतमजूर ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मृतकाचे नाव अशोक उईके रा. मौदी असे असून तो गावालगतच्या अग्रवाल फार्म हाऊस येथे शेतमजुरीचे काम करायचा. दुपारी बारा वाजता पासून तो फार्म हाऊसच्या कंपाउंड शेजारी गाई चारत होता. सायं. ला तो परत न आल्याने त्याचा शोध घेतांना ही घटना समोर आली.