कोपरगाव: शहरातील आंबेडकर स्मारक परिसरात शहर पोलिसांकडून विनानंबर प्लेट व ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवर कारवाई
कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कोपरगाव शहर पोलिसांनी विना नंबर प्लेट व ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर धडक कारवाई केली आहे. अचानक केलेल्या या धडक कारवाईमुळे दुचाकी स्वारांची चांगलीच पळापळ झाली आहे.सायंकाळी दरम्यान पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने आंबेडकर स्मारक परिसरात थांबून ही कारवाई केली आहे. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे