गोंदिया: झीलमिली येथे दारूच्या नशेत वृद्धावर हल्ला
विटाच्या तुकड्याने डोक्यावर प्रहार; पोलिसांत गुन्हा दाखल
Gondiya, Gondia | Sep 17, 2025 रावणवाडी पोलीस ठाणे हद्दीतील झिलमिली गावात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून एका ६५ वर्षीय वृद्धावर विटाच्या तुकड्याने हल्ला करण्यात आला आहे. ही घटना १६ सप्टेंबर रोजी रात्री ८:१५ वाजता झढलमिली येथे घडली. या घटनेत वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलीराम फत्तु शामकुवर (६५) रा. झिलमिली, ता. गोंदिया हे आपल्या घरासमोर बसून बीडी ओढ