हिंगोली: जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरम ची 150 वर्ष भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन साजरा
हिंगोली येथील जिल्हा परिषद मैदानावर वंदे मातरम ची 150 वर्ष भारत मातेच्या स्तुतीचा गौरव दिन उत्साहात साजरा करत सामूहिक वंदे मातरम चे गायन करण्यात आले. यावेळी वंदे मातरम् गीता संदर्भात सखोल माहिती देण्यासाठी मुख्य वक्ता म्हणून कृष्णा देशमुख आले होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता. क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, महावितरण चे अधीक्षक अभियंता राजेश सिंग चव्हाण, प्राध्यापक साहू सर, गजानन ठाकूर, व अनेक शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.