जालना जिल्हातील अंबड तालुका आणि घनसावंगी तालुका येथे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय अनुदानात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. सोमवार दि. 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपी व एजंटचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.