हिंगणा: वनग्राम शिवारात कुंपणाच्या तारेतील विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
Hingna, Nagpur | Oct 25, 2025 कुंपणाच्या तारेला स्पर्श करताच जोरात विजेचा धक्का लागला आणि त्यातच शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कान्होलीबारानजीकच्या वनग्राम शिवारात घडली. देवीदास धवने हरिभाऊ देवीदास धवने असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची वनग्राम शिवारात शेती असून, या शिवारात वन्यप्राण्यांचा मोठा उपद्रव आहेत. ते पिकांची नासाडी करीत असल्याने त्यांनी शेताला तारांचे कुंपण तयार केले शिवाय, वन्यप्राण्यांपासून पिकाचा बचाव करण्यासाठी त्या तारांमध्ये वीजप्रवाह प्रवाहित केला. Hello Nagpur