कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे एका सोनाराला बेन्टेक्सचे दागिने खरे असल्याचे भासवून त्यांची लाखाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी देवकर ज्वेलर्सचे संचालक रामदास देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसात अभिजित बंडू गदळे आणि राहुल अर्जुन मोरे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.