जयंत पाटील यांनी नाव ना घेता केलेल्या आरोपांवर सुरेश धस यांनी महाविकास आघाडीचं सगळंच काढलं. अपरात्री पोलीस पाठवून जमीन घोटाळ्याचे आरोप, मंदिर व इमाम जमीन बालकावल्याचे आरोप केल्याबद्द्दल आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सगळं सविस्तर सांगितलं. ते म्हणाले रात्री एक वाजता महाविकास आघाडीचे सरकार असताना माझ्या घरी डी वाय एस पी आणि पीआय पाठवले आणि दरवाजा उघडून आहेत का घरात असे विचारले होते हे आम्ही त्यांच्या काळात अनुभवले आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी आज सभागृहात केला आहे.