वर्धा जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. सरकारी नियमांचे पालन करणे एका डीजे चालकासाठी चांगलेच महागात पडले आहे. देवळी तालुक्यातील पिंपळगाव लुटे येथे वाढदिवसाच्या पार्टीत डीजे बंद केल्याच्या कारणावरून दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. असे आज 16 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे