आर्णी: दोन दुचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी सावळी उमरी रस्त्यावर झाला अपघात
Arni, Yavatmal | Sep 14, 2025 आर्णी तालुक्यातील सावळी उमरी रस्त्यावर दोन दुचाकीचा अपघात झाल्याची घटना दिनांक १३ सप्टेंबरला घडली आहे सदर घटनेची तक्रार पारवा पोलिसात संजय रामा पेंदोर यांनी दिली आहे तक्रारीनुसार तक्रारदाराचा मुलगा कृष्णा सोयाम हा आपल्या दुचाकी ने सावळी येथून फवारणीचे औषध घेऊन येत असताना आरोपीने दुचाकीने त्याला धडक देऊन अपघात केला यामध्ये तक्रारदाराचा मुलगा हा गंभीर जखमी झाला आहे अशा तक्रारीवरून परवा पोलिसांनी वरील आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे तसेच पुढील तपास परवा पोलीस करीत आहे