रावणवाडी पोलीस ठाणे अंतर्गत हलबीटोला, प्रतापबाग रेल्वे स्टेशन जवळ सार्वजनिक ठिकाणी तास पत्तीवर जुगार खेळणाऱ्या लोकांना रावणवाडी पोलिसांनी ६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता पकडले. आरोपी महेंद्र मनोहर हिरापुरे (४७) रा. मोहरानटोली (नागरा) याच्या जवळून ६०० रूपये, दुर्गेश मंगल बघेले (२६) रा. नागरा याच्या जवळून ४५० रूपये, संतोष बाळु गोंडाणे (४५) नागरा याच्या जवळून ३०० रूपये रोख, संदीप मोहनलाल बावणे (३०) रा. नवरगाव (आसोली) याच्या जवळून ६५० रूपये जप्त केल