गोंदिया: भारत फायनान्स कंपनीत तब्बल ६.७१ लाखांची फसवणूक, अवंती चौक येथील घटना
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी दुर्गेश रूपचंद थेर (वय ३३, रा. जवरी, ता. आमगाव) यांच्या तक्रारीनुसार, भारत फायनान्स कंपनीत काम करणारे सरोज सुरेश बडगे (रा. रीसामा, ता. आमगाव) व प्रतीक विनोद गेडाम (रा. आंबेडकर नगर, तुमसर, जि. भंडारा) यांनी कंपनीच्या सदस्यांकडून वसुल झालेल्या पैशांचा अपहार केला.