सांगोला: चार जणांचा पावसात बळी; प्रशासनाची संवेदनशीलता मृतांच्या खात्यात मदतीचे पैसे वेगाने जमा
सांगोला तालुक्यात 19 पासून झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार संतोष कणसे यांनी 30 सप्टें सायं. 7 च्या सुमारास माहिती दिली.कडलास व राजुरीसह 60 कुटुंबांच्या घरात पाणी शिरले असून त्यांना प्रशासनाकडून धान्यवाटप व प्रत्येकी ₹10,000 आर्थिक मदतीचे बिल टाकण्यात आले आहे. तालुक्यात 127 घरे पडली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. पावसामुळे नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने तीन मुलांसह एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबांना तातडीने मदत पोहोचवण्यात आल्याचे ते म्हणाले.