लोहा तालुक्यातील मौजे बोरगाव येथे फिर्यादीचे शेतातील घरामध्ये दि 15 डिसेंबर 2025 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास यातील आरोपी साईनाथ निळकंठ व इतर 2 इसम यांनी फिर्यादीचे चायनलगेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील बॅगमध्ये ठेवलेले नगदी 1 लाख रुपये चोरून नेले. याप्रकरणी फिर्यादी झुंबरबाई घोरबांड वय 70 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनखेड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला असून सदरच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती आज रोजी दुपारी प्राप्त झाली आहे.