वर्धा: निवडणूक जवळ: वर्धा नगर पालिकेच्या प्रभाग यादीत 'गोंधळ'! मतदारांच्या संख्येत मोठी तफावत
Wardha, Wardha | Oct 10, 2025 गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. नगराध्यक्षपदाचे थेट आरक्षण आणि प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.मात्र, याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. वर्धा नगर पालिकेच्या प्रभाग मतदार याद्यांमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. प्रभागात मतदारांची संख्या कमी, तर काही ठिकाणी खूपच जास्त दिसतआहे यामुळे इच्छूक उमेदवारांमध्ये आणि नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याचे आज 10ऑक्टो रोजी रात्री 10वा प्रसिद्ध दिले