आर्णी: जवळा येथे एस.टी. बस न थांबल्याने नागरिकांचा संताप;आर्णी बायपासवर बस अडवून चालक-वाहकाला जाब
Arni, Yavatmal | Oct 29, 2025 आर्णी तालुक्यातील नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर जवळा गावाजवळ नवीन बायपास मार्ग देण्यात आला आहे. मात्र या बायपासवर एस.टी. बस थांबत नसल्याने जवळा येथील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.,दिनांक 29 ऑक्टोबर ला स्थानिक नागरिकांनी आर्णी बायपासवरून जाणारी एस.टी. बस अडवून चालक व वाहकाला जाब विचारला. गावाजवळ बस थांबत नसल्याने विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली.