नेवासा - व्हायरल क्लिप व पोस्टमुळे वाद चहाट्यावर ; देवस्थानची बदनामी थांबवावी - अभंग
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील माऊलींच्या पैस खांबाच्या दर्शनासाठी आषाढ कामिका एकादशीला लाखो भाविक राज्यभरातून श्रीक्षेत्र नेवासा या ठिकाणी येत असतात. आणि त्याच दिवशी दर्शनावरून एका विश्वस्ताचे आणि उद्योजकाचे मंदिर परिसरात वादीवाद झाले होते, आणि काही वेळातच झालेले वाद मिटवून घडलेल्या प्रकारावर पडदा पडला होता. आणि चर्चाही थांबवण्यात आली होती, मात्र संस्थांमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल सोशल मीडियावर लिखाण आणि पोस्ट करून झालेला वाद पुन्हा ऐरणीवर आणला आणि त्यानंतर वादाचे सीसीटीव्ही फुटेज तीन दिवसानंतर सोशल मीडियावर वायरल झाल्याने तालुक्यात चर्चा रंगू लागल्याने ज्ञानेश्वर मंदिर संस्थांची प्रतिमा मलीन केली जात असून संत ज्ञानेश्वर मंदिराची होणारी बदनामी संस्था थांबवणार का? असा प्रश्न नेवासकरांसह भाविकांतून विचारला जात आहे.