छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम देत भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी स्पष्ट केले की सरकारमध्ये कुणीही नाराज नसून राज्यात महायुती उत्तम कामगिरी करत आहे. विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्याने ते महायुतीत नाराजी असल्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही खासदार डॉ भागवत कराड यांनी सांगितले.