जालना शहर महानगरपालिकेच्या महिल्याच निवडणूकीसाठी दि. 15 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. शिवाय बुधवार दि. 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता सोशल मिडीयवर एक व्हिडीओ रिलीज केला असून तो सर्वत्र व्हायरलही झालाय. अत्यंत सुसंगत आणि उत्कृष्ट मांडणीसह या व्हिडीओतून मतदान करण्याचा संदेश देण्यात आला आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे केलेच पाहिजे, त्यासाठी जेष्ठांनीही पुढे आले पाहिजे.