वाशिम: सायबर गुन्हे, डिजिटल युगातील नवे संकट, ऑनलाईन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याचे वाशिम पोलिसांचे आवाहन
Washim, Washim | Oct 29, 2025 आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार वाढले असून, या सोयीसुविधांच्या आडून सायबर संकट वेळीच ओळखणे गरजेचे बनले आहे. वरिष्ठ नागरिक, निवृत्त व्यक्ती आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर वयस्कर लोकांना मोठ्या प्रमाणात लक्ष करण्यात येत असून ही अत्यंत चिंतेची बाब आहे. त्यामुळे सद्या सर्वांसमोर सायबर गुन्हेगारीचे नवे आव्हान उभे राहले असून ऑनलाईन व्यवहार करतांना सर्वांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन दि. 29 ऑक्टोबर रोजी पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.