वैजापूर: गंगापूर रोडवर चोरवाघलगाव शिवारात अपघातात दोघांचा मृत्यू
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गंगापूर रोडवर चोरवाघलगाव शिवारात रविवारी सकाळच्या सुमारास घडली. हनिफाबी अलीम सय्यद वय 45 वर्षे व अलीम कमरुद्दीन सय्यद वय 50 वर्षे दोघेही राहणार टकिया गंगापूर अशी घटनेतील मयतांची नावे आहे.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अलीम शहा व हनिफा शहा हे म्हस्की येथे नातेवाईकांच्या मौती साठी जात असताना गंगापूर रोडवर चोरवाघलगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला.