रामटेक येथील अंबाळा परिसरात असलेले धार्मिक स्थळ नारायण स्वामी टेकडी परिसरात नारायण स्वामी पुण्यतिथी महोत्सवाला 18 डिसेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे. हा महोत्सव आगामी 26 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. नऊ दिवसांपर्यंत सद्गुरु नारायण स्वामी व श्री दत्तगुरु बालयोगी छोटी बाबा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरुवात सुश्री साध्वीजी महाराज यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली.