घाटंजी: राजापेठ शेत शिवारात करंट लागून एकाचा मृत्यू,पारवा पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी सुदर्शन भाऊराव नैताम यांच्या तक्रारीनुसार 31 ऑक्टोबरला फिर्यादीचा भाऊ मंगेश नैताम हा त्याच्या साथीदारासोबत खेकडे पकडून घरी जात असताना राजापेठ शेतशिवारात आरोपी नागेश रावते याने मक्त्याने करत असलेल्या शेतातील विद्युत तारेला मंगेश नैताम याचा स्पर्श झाल्याने मंगेश नैताम हा जागीच मरण पावला. मंगेश नैताम यांच्या मरणास आरोपी हा कारणीभूत असून आरोपीने शेतातील तार गुंडाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एक नोव्हेंबरला पारवा पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा..