9 ऑक्टोबरला सायंकाळी अंदाजे चार वाजता च्या सुमारास आरोपी नयन राऊत हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरमध्ये अवैधरित्या विनापरवाना मुरूम चोरून घेऊन जात असताना पोलिसांना मिळून आला असता आरोपीच्या ताब्यातून ट्रॅक्टर व मुरूम असा एकूण तीन लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तसेच 17 ऑक्टोबरला रात्री अंदाजे साडेआठ वाजताच्या सुमारास लोहारा पोलिसात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.