मलकापूर: शहरातील चैतन्यवाडी येथे घरातून ६ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या महिलेस अमरावतीतून अटक
मलकापूर शहरातील चैतन्यवाडी येथे १० आक्टोबर रोजी भर दिवसा अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत कपाटील लॉकरमधून सोन्या, चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा ६ लाख ८१ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला.याप्रकरणी रविकिरण राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता.