पनवेल: गुणवत्तापूर्ण सुविधा पूर्ततेप्रमाणेच त्यासाठी कार्यरत कर्मचारीहिताय निर्णयावर आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा भर
Panvel, Raigad | Dec 2, 2025 नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार व सन्मान प्राप्त केले असून दर्जेदार नागरी सेवा सुविधा पूर्ततेवर भर देत असतानाच लोकाभिमुख प्रशासन राबविण्यासाठी महानगरपालिकेशी संबंधित विविध लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यावर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. या कार्यवाहीत महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा महत्वाचा वाटा आहे. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अधिकारी, कर्मचारी हिताच्या प्रशासकीय बाबींकडे विशेष लक्ष दिले आहे. याकरिता अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय बाबींकरीता विशेष समिती गठीत करण्यात आली असून प्रशासन विभागाचे उपआयुक्त सदस्य सचिव असलेल्या या समितीमार्फत केल्या जाणाऱ्या कार्यवाहीचा नियमीत आढावा घेतला जात आहे.