उमरखेड: तालुक्यातील 400 चे वर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत घेतला प्रवेश
यवतमाळ येथील उत्सव मंगल कार्यालयात शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते जाहीर पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात स्व वसंतराव नाईक प्रतिष्ठान उमरखेड व श्रीराम मित्र मंडळाचे सक्रिय सदस्य गोपाल राठोड यांचे पुढाकारात उमरखेड तालुक्यातील 400 चे वर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.