गेल्या दोन-तीन दिवसापासून नाशिक शहरात थंडीचे लाट मोठ्या प्रमाणात वाढली असून आज नाशिक मध्ये कमाल 13 तर किमान 26 सेल्सिअस तापमान नोंदवला गेला आहे तर निफाड मध्ये सर्वात कमी सात सेल्सिअस तापमान नोंदवल्या गेल्याने थंडीची लाट अधिकच वाढली आहे. सध्या शेकोट्यांचे प्रमाण वाढले असून फिरणाऱ्यांची संख्याही रस्त्यावर दिसत नसल्याने घरात राहण्यास नागरिकांनी पसंत केल्याचेही दिसून येत आहे. पुढील महिन्यात थंडी अधिकच असण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.