मंगळवेढा: पंचनामे करून सरकार शेतकऱ्यांना भक्कम आधार देईल : आमदार समाधान आवताडे
अतिवृष्टीमुळे मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. दरम्यान, या नुकसानीची पाहणी आमदार समाधान आवताडे यांनी केली आहे. आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी तीन वाजता त्यांनी मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील पिकांची पाहणी केली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान, सरकार शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना भक्कम आधार देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.