चंद्रपूर: बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्यांचा मृत्यू, राजगड येथील घटना
बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपुरातील राजगड येथे घडली असून शेळी मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान बिबट्या गावात येऊन दहशत माजवत असून गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.