करवीर: भाजपा युवा मोर्चा कोल्हापुर आयोजित नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोंबर पर्यंत संपूर्ण देशभरात भाजपाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांचा सहभाग आहे. याच धर्तीवर आज भाजपा युवा मोर्चा कोल्हापूर आयोजित नमो युवा रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस ग्राउंड या ठिकाणी सकाळी 6 : 30 वाजता हजारांहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.