गोंडपिंपरी: जिल्हाधिकारी जी सी गौडा यांनी केली गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी
जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी गोंडपिपरी तालुक्यातील विविध विकासकामांना क्षेत्रीय भेट देत आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिका-यांनी गोंडपिपरी येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीला भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली. इमारतीचे बांधकाम पुढील आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या सुचना त्यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिल्या.