राहुरी: शहरातील विठ्ठला लॉन्स येथे विवाह सोहळ्या दरम्यान अज्ञात भामट्याने नवरीचे वीस तोळे दागिने असलेली बॅग हिसकावून ठोकली धुम
राहुरी शहरातील विठ्ठला लॉन्स येथे आज शुक्रवारी राञीच्या दरम्यान एका विवाह सोहळ्यादम्यान लॉन्समध्ये आलेल्या दोन अज्ञात भामट्यांनी नवरीचे सुमारे २० तोळे सोन्याचे दागीने असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली सदर घटनेने वर्हाडी मंडळात घबराट पसरली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.