घनसावंगी: राहेरा-तणवाडी शिवारात ऊसाला भीषण आग — कोटींचे नुकसान*
घनसावंगी तालुक्यातील राहेरा
जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे *राहेरा-तणवाडी शिवारात ऊसाला भीषण आग — कोटींचे नुकसान* घनसावंगी तालुक्यातील राहेरा तणवाडी येथील शेती गट क्रमांक ७८, ७९ व ८१ मधील सुमारे ५० ते ५५ एकर ऊस शेतीला आज (१४ ऑक्टोबर) दुपारी सुमारे १ वाजता अचानक भीषण आग लागली. ही आग महावितरणच्या मुख्य विद्युत वाहिनीतील शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीत किशोर ज्ञानदेव शेडगे, तुकाराम पाटीलबा शेडगे, विष्णु बापुराव इंगळे, अंजना गंगाधर इंगळे, द्रौपदाबाई बापुराव इंगळे, दामोधर बापुराव इंगळे व लक