शिरपूर: शिरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का,माजी नगरसेवकांसह अनेक नेत्यांचा मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश
Shirpur, Dhule | Nov 10, 2025 आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.10 नोव्हेंबर 2025 रोजी भाजपचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.या घडामोडींमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना चालना मिळाली असून भाजपच्या संघटनेत मोठी खळबळ उडाली आहे.