जालना: आंबेडकरी समाजाचा 6 तास आयुक्तांच्या कार्यालयासमोर ठिय्या; मोती तलावात तथागत भगवान गौतम बुध्दांची मुर्ती बसविण्याची मागणी
Jalna, Jalna | Sep 15, 2025 जालना शहरातील मोती तलावात तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे आंबेडकरी समाज आणि त्यांच्याशी निगडित संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून यापुढे तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. दरम्यान सोमवार दि. 15 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर तब्बल 6 तास आंदोलकांनी ठिय्या दिला.