धाराशिव तालुक्यातील जवळा दुमाला परिसरात पूल वाहून गेला, आ. राणा पाटील यांनी केली पाहणी
Dharashiv, Dharavshiv | Sep 14, 2025
शनिवार, दिनांक 13 रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे धाराशिव तालुक्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पावसामुळे जवळा दुमाला परिसरातील रहदारीच्या रस्त्यावरील पूल वाहून गेला आहे. या घटनेची पाहणी आमदार राणा पाटील यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळी जाऊन केली. त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून तात्पुरत्या स्वरूपात तातडीने काम सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.