पुणे शहर: भवानी पेठ येथे आरोग्य सेवकांचे शाल, श्रीफळ देऊन कौतुक
Pune City, Pune | Oct 21, 2025 आज परिमंडळ क्रमांक 5 , भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बुरुडी पूल स्मार्ट कलेक्शन पॉइंट येथे 'स्वच्छ दिवाळी - शुभ दिवाळी' उपक्रमांतर्गत परिसर रांगोळी आणि फुलांनी सुंदरपणे सजवण्यात आला होता. तसेच आरोग्य कोठीकडील सेवक व स्वच्छ सभासद यांना शाल, श्रीफळ व गुलाबाचे फूल देऊन कौतुक व सन्मान केले.