शहादा: परिवर्धा गावाजवळ दुचाकीच्या अपघातात 35 वर्षीय व्यक्ती ठार, शहादा पोलीस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल
शहादा बोरद रस्त्यावरील परिवर्धा गावाजवळील वळण रस्त्यावर भडगाव वेगातील दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने साईडला असलेल्या लोखंडी डिव्हायडरला धडक झाल्याने 35 वर्षीय निलेश लक्ष्मण पाटील रा. बोरद हा येत असताना दुचाकीचा अपघात झाला होता. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात स्वतःच्या मरणास कारणीभूत ठरल्या प्रकरणी दत्तू भरत पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.