बुलढाणा: काँग्रेस परिवहन सेल जिल्हाध्यक्ष सैय्यद ईरफान यांचा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश
बुलढाणा तालुक्यातील राजकीय वातावरणात आज २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता महत्वपूर्ण घटना घडली आहे. काँग्रेस पक्षाचे परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष सैय्यद इरफान यांनी चिरंजीव सैय्यद मतीन यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी विधानसभा समन्वयक ॲड. गणेशसिंग राजपूत आदी उपस्थित होते.