नरखेड: पेठ मुक्तापूर येथून धक्कादायक प्रकार आला समोर, शेतकरी अनुदानातून पैशाची मागणी करण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
एक वायरल होत असलेली ऑडिओ क्लिप हाती आलेली आहे. ही वायरल होत असलेली ऑडिओ क्लिप नरखेड तालुक्यातील पेठ मुक्तापूर या गावातील असल्याची सांगण्यात येत आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये आपण ऐकू शकता की एक व्यक्ती शेतकऱ्यांसोबत बोलत आहे आणि त्याने चक्क शेतकरी अनुदानातूनच पैशाची मागणी केली आहे. दरम्यान कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिप मधील मॅडम कोण? आणि त्यांच्यावर काय कार्यवाही होईल.