आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील नियोजित साधुग्राम, गोदावरी नदीवरील घाट आणि डीपी रस्ता आणि त्याला जोडणाऱ्या जोड रस्त्यांचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिले. सिंहस्थ कुंभमेळा अंतर्गत साधुग्राम व पायाभूत सोयी सुविधांची पाहणी व आढावा बैठक आज दुपारी त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपस्थित होते.