महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या मौदा विभागाअंतर्गत रामटेक तालुक्यातील 33/11 केवी क्षमतेच्या घोटीटोक व वडंबा उपकेंद्राला आयएसओ 9001: 2015 प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.या उपकेंद्राद्वारे दूरवर व आदिवासी बहुलक्षेत्रातील 72 गावांना विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यांना तेरा जानेवारीला हे प्रमाणपत्र देण्यात आले. सर्व यंत्रसामुग्री आणि प्रणालीच्या संपूर्ण तपासणी नंतर एम एस ई डी सी एल च्या ध्येय व उद्देशांच्या अनुरूप उपकेंद्रांची निवड करण्यात आली आहे.