आज दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास कल्याण येथील सहजीवन सोसायटीच्या रहिवाशांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. दोन वर्षांपूर्वी सदर ठिकाणी गॅसची पाईपलाईन आली आहे. मात्र गॅस कनेक्शन देण्यात आले नाही. त्या पार्श्वभूमीवर या रहिवाशांनी आज ठिय्या आंदोलन केलं आहे. तसेच प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहेत.